Latest Marathi News

BREAKING NEWS

पक्षाच्या वरिष्ठांच्या चुकीमुळे मुख्यमंत्री पद गेले; राष्ट्रवादीच्या कॉंग्रेस नेत्याने व्यक्त केली खंत

0 307

 

राजकारणातील ‘दादा’ म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांना स्पष्टवक्ते आणि फटकळ बोलण्यामुळे ही ओळखले जाते. यामुळे ते अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमध्ये अडकलेल्याचे पाहायला मिळते.

Manganga

मात्र त्यानंतर वाद वाढू नये म्हणून दिलगीरी देखील व्यक्त करतात. अजित पवारांनी सोलापुरच्या एका सभेतील वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच वादात होते. त्यावेळी त्यानी दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी बसून आत्मक्लेश उपोषण केले होते. मात्र काल त्यांनी अशीच एक खंत स्पष्टपणे व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी खंत बोलून दाखवली ते म्हणाले की, “२००४ साली मोठी चूक झाली राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडायला नको होते.

२००४ ला जर मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला आले असत तर चांगले झाले असत अशी खंत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष राष्ट्रवादी ठरला होता. त्या पाठोपाठ काँग्रेस ६९ आणि शिवसेना ६२ तरी देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद काँग्रेससाठी सोडत उपमुख्यमंत्री पद घेतले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!