पुणे : कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कसबा मतदार संघासाठी हेमंत रासने आणि चिंचवड मतदार संघासाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे.
दोन्ही मतदार संघात इच्छूकांची मोठी यादी होती. नेमकी भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची सगळ्यांना उत्सुकता होती. त्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. या सगळ्या चर्चांवर पडदा पडला आहे. आता महाविकास आघाडी सरकारकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

Maharashtra | BJP releases list of its candidates for by-elections in Chinchwad & Kasba Peth Assembly constituencies. pic.twitter.com/wmQxCoranH
— ANI (@ANI) February 4, 2023