Latest Marathi News

BREAKING NEWS

जन्मदात्या मुलानेच केली मोबाईलसाठी आईला मारहाण

0 145

 

अहमदनगर : नवीन मोबाईल घेऊन देण्यासाठी आईला एकाने हातोड्याने मारले. शहरातील बाजार समितीमधील राम एजन्सीमध्ये गुरुवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
मनीषा बाळासाहेब बोरगे या राम एजन्सीमध्ये कामाला आहेत. त्यांचा मुलगा राज हा गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता दुकानात आला. नवीन मोबाईल घेऊन दे, असा त्याने आईकडे आग्रह धरला. त्या वेळी आईने त्याला, सध्या एवढे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतरही तो दुकानाबाहेर बसून राहिला.

Manganga

दुपारी साडेबाराच्या सुमारास हातोडा घेऊन आला आणि आईच्या डाव्या पायावर मारला. स्टीलचा ग्लास कपाळावर जोरात मारला. या घटनेची माहिती कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. कोतवाली पोलिसांनी महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर तिच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!