अहमदाबाद – गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात आज सकाळी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही, असे भूकंप विज्ञान संशोधन संस्थेने आपल्या ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अमरेली अहमदाबादपासून सुमारे २४० किमी अंतरावर आहे. ३० जानेवारी रोजी गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले होते