आज कर्करोग दिन आहे. जगभरात दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. दुर्धर आजारांपैकी एक असलेल्या कॅन्सरकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलावा आणि जनजागृती निर्माण व्हावी यासाठी कर्करोग दिन साजरा केला जातो. जगभरात कर्करोगाचे अनेक प्रकार दिसून आले आहेत पण हल्ली एका प्रकारच्या कर्करोगाने तरुणाईंमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. तो म्हणजे स्तनाचा कॅन्सर. तरुण मुलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका का वाढलाय? त्यामागील कारणे काय आहेत.

मागील दहा वर्षांमध्ये तरुण महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढलाय. विशेषत: तरुण महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आढळून आलाय. अगदी 20 ते 30 वर्षांच्या स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कँसरचे निदान झाल्याचे दिसून आले आहे. तरुण वयोगटात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण 15 टक्के आहे, तर 40-45 वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण हे 30 टक्के आहे तर 30 च्या वर स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच प्रमाण हे 16 टक्के आहे. अगदी कमी वयात ब्रेस्ट कॅन्सर होत असल्याने ही चिंतेची बाब आहे.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे
• स्तनाच्या ठिकाणी गोळा येणे किंवा गाठ येणे.
• स्तनाच्या ठिकाणी सूज येणे
• स्तनाच्या ठिकाणी खाज सुटणे.
• स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल होणे
• स्तनाग्रातून स्राव वाहणे
• स्तनामध्ये वेदना होणे.
• स्तनाची त्वचा ओलसर वाटणे
• स्तनाच्या ठिकाणी त्वचा लाल होणे