गौतमी पाटील हे नाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले. लावणीच्या नावाखाली अश्लील हावभाव करत असल्याने तिच्यावर लावणी कलावंत तसेच राजकारणातूनही जोरदार टीका होत आहे. तिचे कार्यक्रम चांगलेच गाजत आहेत. गौतमी पाटील थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

सातारा न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिले यावर गौतमी पाटील म्हणाली, समोरच्या लोकांनी माझ्यावर आरोप केला. त्यांना सांगते की माझ्या चुकीची माफी मागितली आहे. यापुढे चूक होणार नाही. आता सर्व छान सुरु आहे. राजकारणातील प्रवेशावर गौतमी म्हणाली, “मी राजकारणात येणार नाही. मला ते आवडत देखील नाही. त्या गोष्टींमध्ये पडायचे नाही. माझी कला वेगळी आहे, राजकारण वेगले आहे.” राजकारण नाही म्हणत गौतमी पाटीलने हात जोडले. तसेच यापुढे चित्रपट, गाण्यांमध्ये संधी मिळाली तर काम करेल, असे गौतमी म्हणाली.
गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात पुन्हा एकदा काही तरुणांकडून कार्यक्रमात धुडगूस घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी आयोजकांना हा कार्यक्रम थांबविण्याची वेळ आली. हा प्रकार खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे घडला. धुडगूस घालणाऱ्या तरूणांना गावातील महिलांनी दांडक्याने चांगलाच चोप दिला. गौतमीच्या प्रत्येक गाण्यात तरुण धुडगूस घालत असल्याने कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आला. बहिरवाडी गावात यात्रा उत्सवानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.