मेष
आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी – व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
वृषभ
आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्याने आपण यशस्वी व्हाल. आजचा दिवस नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी अनुकूल नाही.
मिथुन
आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळे दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.
कर्क
आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद ह्यापासून शक्यतो दूर राहावे.
सिंह
आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कन्या
आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. दिवस स्वस्थतेत जाईल.
तूळ
आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. पैसा खर्च होईल.
वृश्चिक
आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहावे. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
धनु
आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास,, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक मान – सन्मान वाढेल.
मकर
आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल.
कुंभ
आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास ह्या बध्दल चिंता लागून राहील.
मीन
आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद – विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट – कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही.)
