Latest Marathi News

BREAKING NEWS

विद्यार्थिनी परीक्षा द्यायला आली आणि जुळ्या मुलांची आई झाली

0 451

 

बिहारच्या बेगुसराय येथे परीक्षेदरम्यान विद्यार्थिनी निशा कुमारी जुळ्या मुलांची आई झाली आहे. बिहारमध्ये इंटरमिजिएटची परीक्षा सुरू आहे. गुरुवारी एका विद्यार्थिनीला परीक्षेच्या दरम्यान अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यानंतर तिच्यासाठी एम्ब्युलन्स बोलावण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र बलि या येथे आणण्यात आले. विद्यार्थिनीने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.

Manganga

परीक्षार्थी निशा कुमारीने जुळ्या मुलांना जन्म दिला, ज्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. केंद्रीय अधीक्षक अरविंद कुमार यांनी परीक्षेचा वेळ संपायला आला होता. याच दरम्यान, हीराटोल येथील रोशन यादव यांची पत्नी निशा कुमारी यांना असह्य प्रसूती वेदना होऊ लागल्या. प्रसूती वेदनांमुळे विव्हळत असलेल्या विद्यार्थिनीला रुग्णवाहिका बोलावून बलिया पीएचसीमध्ये पाठवण्यात आले, जिथे तिने एका मुलाला आणि एका मुलीला जन्म दिला.

विद्यार्थिनीची यशस्वी प्रसूती झाल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुमार यांनी सांगितले. नवजात अर्भकाचे वजन कमी असल्याने बेगुसरायला चांगल्या उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान जुळ्या मुलाला जन्म दिल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!