चुलता आणि चुलतीचा घटस्फोट झाल्यानंतर पुतण्याने चुलतीशी अनैतिक संबंध ठेवले. मात्र हे प्रकरण पुढे खूनापर्यंत जावून पोहोचले. चार वर्षांपूर्वी एक घटना घडली होती. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील पोलिसांना एक माहिती मिळते. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग ७५ वर एक मृतदेह पोलिसांना सापडतो. सुरुवातीला पोलिसांना हा अपघात वाटतो. त्यादृष्टीने मृत्यूची नोंदही केली जाते. त्यानंतर पोलिस महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवतात. मृत महिलेचे वय २३ वर्षे होते. तिचा काही दिवसांपूर्वी घटस्फोटही झालेला होता. परंतु अपघातावर घरच्यांचा अजिबात विश्वास नव्हता. मृत महिलेच्या कुटुंबातील लोक आणि गावकरी पोलिस ठाण्यात ठाण मांडतात. नाईलाजाने पोलिसांना एफआयआर दाखल करावा लागतो.

पुढे पोलिसांच्या विशेष पथकाने प्रकरणाचा तपास सुरु केला. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत महिलेल्या डोक्याला मार लागल्याचे पोलिसांना समजलेले होते. पोलिस मृत महिलेच्या घराची तपासणी करतात. तिथे पोलिसांना एक सिम कार्ड सापडते. सापडलेल्या सिम कार्डचा सीडीआर पोलिस मिळवतात आणि धक्काच बसतो. हे सिमकार्ड मृत महिलेचे नव्हतेच. ते त्या महिलेच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या पुतण्याचे होते. सद्दाम अन्सारी असे त्या पुतण्याचे नाव.
सुरुवातीला तिने त्याला फार गांभीर्याने घेतले नाही. परंतु नंतर तिचंही त्याच्यावर मन जडले. नात्यातल्या मर्यादा विसरुन दोघांनी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. मात्र चुलती सद्दामवर लग्नासाठी दबाव आणू लागली. त्यामुळे तो त्रस्त झाला. सद्दामने एक दिवस लग्नाचा बहाणा करुन चुलतीला बोलावून घेतले. तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन तिचा खून केला. मृतदेह रस्त्यावर फेकून अपघाताचा बनाव केला. प्रकरणाच्या तपासानंतर सद्दावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.