भारतात टॅलेंटला कमी नाही, फक्त प्रत्येकाला व्यासपीठ मिळायला हवे. कारण भारतात अनेक जुगाडू तरूण आहेत. असे तरूण तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक प्रकारच्या जुगाडू वस्तू तयार करत असतात. सध्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याने चक्क लाकडापासून सायकल बनवली आहे.

सुरूवातीला हे वाचून आपला यावर विश्वास बसणार नाही पण हो. हे खरे आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलाने चक्क झाडाच्या लाकडापासून सायकल बनवली आहे. लोखंडी दांडीऐवजी या मुलाने चक्क लाकडाचे बुंधे वापरले आहेत. तर त्यावर मशीन बसवून सायकल बनवली आहे.
यानंतर या तरूणाने सायकल सुसाट वेगाने नेली आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण ही सायकल पाहून आपणही चकित व्हाल. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओवर २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.