सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लहान मुलांचाही सामावेश असतो. तर अनेकवेळा लहान मुलांच्या गाण्याचे आणि डान्सचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या एका लहान चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती “अयि गिरि नन्दिनी नन्दिती मेदिनी” हे स्त्रोत म्हणताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी दुर्गादेवीचे स्त्रोत बोलताना दिसत आहे. तर तिच्या वडिलांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. संस्कृत श्लोक म्हणायला खूप अवघड असतात. तर अनेकदा आपल्यालासुद्धा संस्कृत वाचायला अवघड जाते. या चिमुकलीने गायलेल्या श्लोकामुळे तिचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. या व्हिडिओला १ लाख १४ हजार नेटकऱ्यांनी लाईक केले आहे.