Latest Marathi News

BREAKING NEWS

MPSC च्या विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन

0 190

 

एम पी एस सी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर आले आहेत. नवीन वर्णनात्मक अभ्यास २०२३ पासूनच लागू करावा या मागणीसाठी पुण्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. आता एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर परिक्षा घेण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यातील अलका चौकात त्यासाठी विद्यार्थी एकत्र आले आहेत.

Manganga

तीन दिवसांपुर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून युपीएससीच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमानुसार 2025 पर्यंत परिक्षा नकोत यासाठी आंदोलन करण्यात आले होत. त्यानंतर सरकारकडून 2023 एवजी 2025 पासून नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा घेण्यात येतील असे जाहीर करण्यात आल. मात्र विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाची याच्या नेमकी उलटी मागणी आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसार परिक्षा 2025 पासून नव्हे तर 2023 पासूनच घेण्यात याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि त्याचसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. निर्णय घेण्याचा अधिकार आयोगाला आहे सरकराला नाही. अशी प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!