आटपाडी : गजानन पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा : कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे ‘रक्षक’ परिवाराचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त मेजर व रक्षक ग्रुपचे संस्थापक गजानन केशव पाटील यांचा अमृतमहोत्सव सोहळा आज आटपाडी येथे संपन्न होणार आहे.
सदरचा अमृत महोत्सव सोहळा हा आटपाडी काळामळा येथील गजकला निवास या ठिकाणी आज दिनांक ३ फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून या अमृत महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन रक्षक परिवाराच्या वतीने रणजितसिंह पाटील यांनी केले आहे.
