नागपूरकर “गाणार” आज “कमळाबाई” जाणार बावन “कुळां” चा उद्धार , काही दिवसात होणार l संघाच्या बागेत देवेंद्रजीची -दरी l नितीन जी ठरतील का भावी “गड”करी?
मुंबई : नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबोले यांनी भाजपाचे उमेदवार नागोराव गाणार यांचा पराभव केला आहे. भाजपाच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने विजय संपादन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नागपूरमधील विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत चारोळी शेअर केली आहे. त्यांनी भाजपाचा उल्लेख ‘कमळाबाई’ असा केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही टोला लगावला आहे. मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, “नागपूरकर ‘गाणार’… आज ‘कमळाबाई’ जाणार… बावन’कुळां’चा उद्धार… काही दिवसांत होणार… संघाच्या बागेत देवेंद्रजींची दरी… नितीनजी ठरतील का भावी “गड”करी?” त्यामुळे त्यांनी केलेल्या या ट्वीटची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

अडबोले यांनी ७ हजाराहून अधिक मतांनी विजय संपादन केला. अडबोले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दहा वर्षापासून भाजपाकडे असलेली नागपूरची जागा महाविकास आघाडीने जिंकली.
नागपूरकर "गाणार"
आज "कमळाबाई" जाणार
बावन "कुळां" चा उद्धार ,
काही दिवसात होणार l
संघाच्या बागेत देवेंद्रजीची -दरी l
नितीन जी ठरतील का भावी "गड"करी?— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 2, 2023