Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

0 45

 

झारखंडमधील बोकारो येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपींनी कबर खोदून मृतदेह पुरला. याप्रकरणी कारवाई करताना पोलिसांनी कबर खोदून मृतदेह बाहेर काढला आहे. ही धक्कादायक घटना जराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुम्हारडीह गावातील आहे. 22 जानेवारी रोजी बेपत्ता असलेल्या महिलेच्या 40 वर्षीय पतीचा मृतदेह महिलेच्या प्रियकराच्या घराजवळील कबरीतून बाहेर काढण्यात आला.

Manganga

मृत उमा शंकर राय 22 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचा भाऊ रंजीत राय यांनी 25 जानेवारी रोजी पोलिसांत याप्रकरणाची माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी तपासास सुरूवात केली. तपासादरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की, मृत उमा शंकर यांची पत्नी सीता देवी हिचे गावातील राहुल कुमार याच्यासोबत प्रेमसंबंध होते.

उमाशंकर यांच्या अनुपस्थितीत राहुल सीतेला भेटण्यासाठी घरी जात असे. अशातच एके दिवशी उमाशंकर यांनी दोघांनाही घरात रंगेहाथ पकडले. यादरम्यान उमा शंकर आणि राहुल यांच्यात जोरदार वादावादी झाली. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होऊ लागले. दरम्यान, 22 जानेवारी रोजी उमाशंकर अचानक बेपत्ता झाले.

उमा शंकर यांची हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या माहितीवरून दंडाधिकारी नरेश रजक यांच्या उपस्थितीत मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सीता आणि राहुल कुमार यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. हत्या केव्हा आणि कशी झाली, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टवरूनच स्पष्ट होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!