Latest Marathi News

BREAKING NEWS

दोन ट्रकची धडक, अपघातात ट्रकचालक जागीच ठार

0 373

 

यवतमाळ: जिल्ह्यातील वणी वरोरा मार्गावर नायगाव जवळील पेट्रोल पंपाच्या समोरच दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या दोन्ही ट्रक एकमेकांना समोरासमोर धडल्याने ट्रकचा चेंदामेंदा झाला आहे. या भीषण अपघातात एक ट्रक चालक ठार झाल् असून दुसरा गंभीर जखमी आहे. जखमीला तात्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

Manganga

वणी वरोरा मार्गाचे नव्याने बांधकाम होत असल्याने काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यातच मागील काही महिन्यात या मार्गावर अपघाताचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातात नाहक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. वरोरा मार्गावरील नायगाव हद्दीत विरुद्ध दिशेने येणारे दोन ट्रक एकमेकांना समोरासमोर भिडले. या भीषण अपघात एक ट्रक चालक चिरडल्या गेला, त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या ट्रकमधील चालक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडताच प्रत्यक्षदर्शीची गर्दी जमली, तसेच पोलिसांना सूचित करण्यात आले. जखमींला तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले असून मृतकाचे शव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!