नाशिक : माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनने पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये पंचवटीतील शरदचंद्रजी पवार मार्केटमधील हमाल, मापारी सहभागी झाले. पूर्ण करा पूर्ण करा हमाल माथाडी कामगारांच्या मागण्या पूर्ण करा. बाजार समितीत नाशिक, दिंडोरी, सिन्नर, निफाड तालुक्यातील तसेच म्हसरूळ, आडगाव, मखमलाबाद, नांदूर – मानूर दसक – पचक आदी भागांतून कांद्याची आवक होत असते.

राज्य शासनाच्या विविध विभागांकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती यादीच या वेळी वाचून दाखविण्यात आली. शासन निर्मित महामंडळ कर्मचारी नाहीत. आमचे पगार पाच तारखेऐवजी उशिरा होतात. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मोर्चे काढू. हा एक दिवसीय लाक्षणिक संप होता, यापुढे बेमुदत संपावर जाऊ.
राज्य सरकारने सकारात्मक विचार करीत विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करून या पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सदस्यांच्या नेमणुका करणे गरजेचे आहे. विविध माथाडी मंडळांच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुला- मुलींना काम करण्याची संधी देण्यासंदर्भात ही मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहे.