Latest Marathi News

BREAKING NEWS

ITI विद्यार्थ्यांना महिना लाख रुपयांचे वेतन

0 405

 

मुंबई: देशातील आयआयटी आणि मोठ्या नामांकित व्यवस्थापन संस्थांच्या विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या नोकरीच्या ऑफर चर्चेत असतात; मात्र यात आता राज्यातील आयटीआयचे विद्यार्थीही मागे राहिले नाहीत. पहिल्यांदाच आयटीआयमधून मोटार मेकॅनिकचा ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना महिना एक लाख आणि त्याहून अधिक रुपयांचे पॅकेज जपानमधील एका नांमकित कंपनीकडून मिळाले आहे.

Manganga

राज्यातील आयटीआयमधून मोटार मेकॅनिक हा ट्रेड पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे पहिल्यांदा संधी मिळाली असली तरी ही पहिली बॅच आहे. त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये आणखी १०० विद्यार्थ्यांना संधी मिळाली असून तेही मोठ्या अभिमानाने लवकरच आपले करियर जपानमधून करणार असल्याने राज्यातील आयटीआयमधील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत सरकार व जपान देशामध्ये मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कौशल्य वृद्धी कार्यक्रमासाठी संयुक्त करार करण्यात आला होता. यामार्फत टेक्नीकल इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम जपानमध्ये तीन ते पाच वर्षे कालावधीच्या राबविण्यात येणार आहे. या कालावधीत उमेदवारांना सरासरी भारतीय चलनात १ लाख प्रतिमहिना वेतनसुद्धा मिळणार आहे. या मुलाखती नॅशनल स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशन यांनी नामनिर्देशित केलेल्या ओरीयन सशी व केन मेंटर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या असून यासाठी जपानमधील उद्योजक अलि ओन व ओव्हरसीज असोसिएशनचे संचालक क्योझावो शिनिचीओ हे उपस्थित राहणार आहेत.

आतापर्यंत टेक्नीकल इंटर्नशिप ट्रेनिंग प्रोग्राम या योजनेमार्फत महाराष्ट्रातील आयटीआयतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. पुढील वर्षअखेर ५०० विद्यार्थ्यांना जपानमध्ये पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी लिओ अँड सॅग्रीटरिअस आणि केन मेंटर्स या कंपनीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर कवी लुथ्रा यांनीही स्वागत केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!