परिक्षेची भीती कुणाला वाटत नाही, भरपूर अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात देखील धाकधूक असते आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही त्यांच्याविषयी तर काही विचारुच नका. यासगळ्यात एक वेगळीच बातमी समोर आली आहे. त्यामध्ये परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला हॉलमध्ये जे काही दिसलं यामुळे तो कमालीचा घाबरून गेला. मनिष नावाच्या त्या विद्यार्थ्याला परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपल्या आजुबाजूला सगळ्या विद्यार्थीनीच असल्याचे दिसून आले. तब्बल तीनशेहून अधिक विद्यार्थीनीमध्ये त्याला पेपर लिहायची वेळ आली. त्यानंतर त्याची अवस्था झाली यामुळे तो थेट हॉस्पिटलमध्येच दाखल झाल्याचे दिसून आले आहे.

परीक्षा हॉलवर गेल्यापासून मनिष अस्वस्थ होता. ज्या विषयाचा पेपर द्यायचा आहे त्याचा अभ्यास झाला होता. आपण एकटेच विद्यार्थी पेपर देणार आहोत बाकी सगळ्या मुली आहेत यामुळे त्याला भीतीच वाटू लागली. पेपर जेव्हा सुरु झाला तेव्हा त्याला आणखी अस्वस्थ वाटले. यामुळे तो बेशुद्ध पडला.
मनीषचे डोके प्रचंड दुखू लागले. त्यानंतर त्याला चक्कर आली आणि तो परीक्षा हॉलमध्येच चक्कर येऊन पडला. तातडीने ती गोष्ट त्याच्या घरच्यांना कळवण्यात आली. ही गोष्ट आहे बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यातील. खरे तर यात चूक मनिषची आहे. त्याने जेव्हा फॉर्म भरला तेव्हा त्यामध्ये मेल ऐवजी फिमेल कॅटगिरी निवडली होती. त्यामुळे त्याच्या प्रवेशपत्रावर तसाच उल्लेख आला जो त्याने यापूर्वी केला होता. आणि त्याचे परीक्षा केंद्र हे मुलींची परीक्षा ज्याठिकाणी घेतली जाते तिथे गेले.