मी आमदार झाल्याशिवाय मरणार नाही. असे वक्तव्य नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविंद्र डोंगरदेव यांनी केले आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे निकाल आज हाती येणार असून नागपूर, कोकण, औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक या पाच मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रविंद्र डोंगरदेव यांनी माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे.

‘आमदार झाल्याशिवाय रवींद्र डोंगरदेव मरणार नाही हे लक्षात ठेवा. मी सुरुवात कमी वयात केली आहे. नक्कीच आयुष्यात यशस्वी होणार. मी वेळेत सुरुवात केली. चांगली सुरुवात अर्ध यश असते. पुढच्या वेळी रवींद्र डोंगरदेव आमदार असणारच.’ असा विश्वास डोंगरदेव यांनी व्यक्त केला आहे. डोंगरदेव हे शिक्षक आजच्या युगातही सर्वांना न चुकता पत्रे पाठवित असतात. आणि पत्रांद्वारे त्यांचा जनसंपर्क इतका वाढला आहे की त्यांनी त्यांच्या निवडणूकीचा प्रचार पत्रांद्वारेच केला.