मुंबई: सरांची मला भिती वाटते, तू माझ्या सोबत उद्या शाळेत चल अशी विनवणी मुलीने आपल्या वहिनीकडे आणि शाळेतील शिक्षकाचा कारनामा उघड झाला. घरच्यांसोबत जेजुरीला जायचे असल्याने तीने दोन दिवसांची सुट्टी शाळेतील शिक्षकाकडे मागितली. यावर शिक्षकाने अपमानास्पद भाषेचा वापर केला. दुसऱ्या दिवशीही संबंधित शिक्षकाने मुलीसोबत अश्लील भाषेत संभाषण केले. खडवली येथील वावेघर परिसरात पिडीत मुलगी कुटूंबासोबत रहाते. खडवलीतील अनुदानित आश्रम शाळेत सदर मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे.
12 तारखेला तिचे वर्गशिक्षक जगदिश चव्हाण हे दुपारनंतर घरी गेले. त्यानंतर लाघी सर हे वर्गावर आले असता मुलीने त्यांच्याकडे दोन दिवसांची सुट्टी मागितली. त्यावर सुट्टी कशासाठी हवी हे विद्यार्थीनीस लाघी याने विचारले असता मुलीने जेजुरीला जायचे असल्याचे सांगितले. 31 जानेवारीला शाळेत हिंदीचा सराव पेपर झाल्यानंतर निवासी मुले जेवण करण्यासाठी घरी गेली होती.

यावेळी पिडीत मुलगी मैत्रिणींसोबत वर्गात बसली होती. दरम्यान लाघी सर वर्गात आले आणि त्यांनी पिडीत मुलीसोबत अश्लील भाषेत संवाद साधला. वहिणीने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. घरच्यांनी तात्काळ ठाणे ग्रामीण पोलिस गाठत शिक्षक लाघी याच्या विरोधात तक्रार दाखल केली. शिक्षकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.