माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पंचायत समिती समोर झालेल्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चार चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, आटपाडी पंचायत समोर पंढरपुर हून भिवघाटच्या दिशेने ओमनी गाडी निघाली होती. तर ओमनीच्या पाठीमागे क्रुझर तर क्रुझरच्या पाठी मागे तवेरा गाडी होती.

यावेळी गाड्या पंचायत समिती जवळ आल्या असता, ओमनी गाडीच्या समोर अचानक दुचाकी आली. यावेळी ओमनी गाडी चालकाने दुचाकीला वाचविण्यासाठी ब्रेक दाबला असता यावेळी पाठीमागून येणाऱ्या क्रुझर चालकाने प्रसंगवधान दाखवत गाडी आटोक्यात आणली. परंतु तवेरा गाडी चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. गाडीने पाठीमागून क्रुझर गाडीला धडक दिली. यामध्ये तवेरा गाडीचे मोठे नुकसान झाले. तर क्रुझर गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.