उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या घटनेनंतर लोकांना भडकवल्याच्या आरोपासह इतर काही आरोपांमध्ये अटकेत असलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची काराग्रहातून सूटका झाली आहे. हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने २३ डिसेंबर रोजी कप्पन यांना ईडीच्या मनी लाँड्रींग केस मध्ये जामीन दिला होता. ते आता २ वर्ष तीन महिने आणि १२ दिवसांनंतर तुरूंगाबाहेर येणार आहेत.

५ ऑक्टोबर २०२० रोजी मथुरा टोल प्लाजा येथून सिद्दीकी कप्पन यांच्यासहर चार जणांना अटक करण्यात आली होती. यूपी पोलिसांनी सांगितले होते की सिद्दिकी कप्पन यांचे पीएफआय सोबत कनेक्शन आहे आणि इतर चार आरोपी हाथरस येथे हिंसा पसरवण्याचा कट करत होते.
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी 28 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलो आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी मीडियाचे आभार मानू इच्छितो. माझ्यावर खोटे आरोप लावले. आता बाहेर पडल्याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांनी दिली आहे.