एसएस राजामौली यांच्या ‘RRR’ सिनेमाने जगभरात भारी कमाई केली आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या, तर अजय देवगण, आलिया भट्ट आणि श्रिया सरनसह अनेक स्टार्सही दिसले होते. जगभरात RRR सिनेमानं १००० करोडची कमाई केली आहे. हा चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर विक्रम तर केलाच मात्र आता तो ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीत आहे.
‘नातू नातू’ या गाण्यालाही पुरस्कारही मिळाला. आता ऑस्करपूर्वी निर्मात्यांनी आता पुन्हा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. विजयेंद्र प्रसाद यांनी केले आहे. यात दोन महान क्रांतिकारकांची काल्पनिक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात राम चरण अल्लुरी सीताराम राजू आणि ज्युनियर एनटीआर कोमाराम भीमच्या भूमिकेत आहेत.

हा चित्रपट 25 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि तिसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, जगभरात दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट बनला. 95 व्या ऑस्कर निकालापूर्वी RRR चे निर्माते हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा रिलीज करण्याची तयारी करत आहेत. निर्माते या चित्रपटाच्या रि-रिलीजसाठी थिएटरची यादी, भाषा आवृत्ती आणि वेळ शॉर्टलिस्ट करत आहेत अशी माहिती समोर आली आहे. ऑस्कर 12 मार्च 2023 रोजी डॉल्बी थिएटरमध्ये होणार आहे.