मोठी बातमी : कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचा विजय : महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांनी केला पराभव मान्य
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच भाजप व महाविकास आघाडी या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या या परीक्षेत कोण बाजी मारणार?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. परंतु कोकण शिक्षक मतदार संघामध्ये भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळविला असून महाविकास आघाडीने पाठींबा दिलेला शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पराभव मान्य केला आहे.
सकाळी 8 वाजेपासून पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रथम मतपेट्या उघडून बाद मते बाहेर काढण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली. कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी 20 हजार 800 मते मिळाली आहे. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पूर्ण केला आहे. त्यामुळे आपला विजय झाल्याची घोषणा ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मान्य केले तर बाळाराम पाटील यांनी पराभव स्वीकारला आहे.
