दिवसेंदिवस मेंदूशीसंबंधीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा यामागचं कारण लहानपणात, कुमार वयात सापडतं. जागे असताना मेंदू सतत कामात असतो. पण गाढ झोपेचा काळ हात मेंदूला आराम देणारा काळ असतो. त्यामुळे योग्य झोप मिळणे गरजेचे आहे. जर ती मिळाली नाही तर मेंदूचे आजार होऊ शकताता, असा निष्कर्ष एका संशोधमातून मांडण्यात आला आहे.

हैद्राबादच्या अपोलो हॉस्पीटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी नुकतच याविषयीचे ट्वीट शेअर केले आहे. त्यात त्यांनी सांगितले आहे की, जेव्हा कुमार वयात मुलांना ७-९ तासांची पुर्ण झोप मिळत नाही. किंवा शांत झोप नसेल तर अशा मुलांना भविष्यात मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदूचा आजार होण्याची शक्यता ४० ते ५० टक्क्यांनी वाढते.
अपुऱ्या झोपेमुळे दाहक जुनाट आजार होण्याचा धोका संभवतो. झोपेचे निर्बंध आणि झोपेची खराब गुणवत्ता यामुळे अतिआक्रमकता रोगप्रतिकारक शक्तींवर परिणाम करते, ज्यामुळे एमएसचा धोका वाढू शकतो. झोप नीट न झाल्यामुळे तुमच्या शरीराचा संपूर्ण ताल बिघडतो आणि त्याचा थेट परिणाम प्रतिकार क्षमतेवर होतो.
हल्लीच्या काळात मुलांना झोपेपासून विचलीत करण्यासाठी भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. इंटरनेट, सिनेमा, व्हिडीओ गेम किंवा अगदी अभ्यास अशा विविध कारणांनी मुलं रात्री नीट झोप घेत नाहीत. झोप शांत लागण्यासाठी शरीर दमणे आवश्यक आहे. त्यासाठी फिजीकल अॅक्टिव्हीटी करण्यासाठी प्रोत्साहीत करा.