शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सावधानतेची भूमिका घेण्याची सूचना दिली आहे. त्यासाठी त्यांनी विशेष फोन वापरण्यास सांगितले असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेतील प्रमुख नेत्यांना आयफोन वापरण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दानवे यांनी विचारले असता. ते म्हणाले, अशा काही सुचना अद्याप आलेल्या नाहीत. आत्ताच्या घडील जे राजकारण सुरु आहे.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी त्यांचे फोन टॅप करण्यात आल्या होत्या. त्याप्रकरणी रश्मी शुक्ला अडचणीत आल्या होत्या. सरकारवर विश्वास नाही का? अस सवाल उपस्थित केल्यानंतर, दानवे म्हणाले आत्ताचे सरकार लहान लहान लोकांना त्रास देत आहे. आत्ताचे सरकार कोणत्याही स्तराला जाऊ शकते. त्यामुळे असा काळात सरकारवर विश्वास नाही. पण आपण खबरदारी घेतली पाहिजे. म्हणून मी कार्यकर्त्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली.