Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी तालुक्यातील जिल्हा मार्ग रस्त्यासाठी ४ कोटी निधी : आम. पडळकर

0 1,681

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील पिंपरी बु. ते खटाव तालुक्यातील कलेढोण या जिल्हा हद्द रस्त्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून दोन्ही तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा होऊन तालुक्यातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या अर्थकारणालाही गती मिळणार आहे, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

यामध्ये रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण, मजबुतीकरण तसेच डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्याच बरोबरच दोन्ही बाजूंनी मुरूम बाजूपट्टी करण्यात येणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाईप व मोरींचे व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.

Manganga

आटपाडी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले असून, सदर रस्त्यांच्या कामामुळे संबंधित गावच्या रस्त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!