Latest Marathi News

BREAKING NEWS

‘या’ जिल्ह्यामध्ये होत आहेत जादूटोणाचे प्रयोग…

0 77

बीड : पात्रुड शिवारातील एका ओढ्याजवळ मागील अनेक दिवसांपासून रात्रीच्यावेळी जादूटोणा, करनी, भानामती यासारखे प्रकार सुरू आहेत. सकाळी लिंबू, कनकेचे दिवे, फुलं, नारळ यांसारख्या वस्तू पाहायला मिळत असल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर शेतात जाणाऱ्या महिला, नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, गावकऱ्यांनी जादूटोणा करणाऱ्या पकडत चोप देत गावातून हाकलून लावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पात्रुड शिवारात जादूटोणाचे प्रयोग होत असल्याने आणि परिसरात लिंबू, नारळ, फुलं, कणकेचे दिवे यांसारखे साहित्य आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महिलासह गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Manganga

मात्र हे सर्व प्रकार कोण करत आहे, याबाबत माहिती नसल्याने त्याचा शोध घेतला जात होते. मात्र याचवेळी बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास परिसरात बाहेरगावाहून एक चारचाकी वाहन परिसरात आले असून, या वाहनातून महिला आणि काही पुरुष जादूटोणा होत असलेल्या ठिकाणी असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली.

त्यामुळे शेकडो गावकरी तिथे पोहचले आणि जाब विचारला. तसेच बाहेरून आलेल्या मांत्रिकासह त्याच्या सहकाऱ्यांना चोप दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!