पंढरपूर : पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माघी वारी यात्रेसाठी आलेल्या तब्बल 137 भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर येत आहे. या भाविकांना तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अचानक भाविकांची प्रकृती बिघडू लागल्याने खळबळ उडाली. पंढरपुरात माघी वारी यात्रेनिमित्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी इथं येत असतात.
आश्रमात अनेक भाविक प्रसाद घेण्यासाठी, तसंच जेवणासाठी येत असतात. येथील संत निळोबा सेवा मंडळ या मठामध्ये काल रात्री भाविकांनी भगर, आमटी खाल्ल्यामुळं त्यांना विषबाधा झाली. यामध्ये 137 भाविकांना त्याची झळ बसली. रात्री दोन वाजता सर्व भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू जाणवून लागला, त्यामुळं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
