Latest Marathi News

BREAKING NEWS

निवडणूकांच्या तोंडावर निधीची घोषणा हा आ. गोरे यांचा स्टंट : संजय भोसले

0 351

म्हसवड/अहमद मुल्ला : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणी मुदत संपून काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपरिषदा या सर्वच निवडणूकांचे बिगूल कोणत्या क्षणात वाजेल याची कल्पना असणार्याल नेत्यांची मंत्रालयामधील बैठकांची लगबग व कोट्यावधी निधी मंजूरीच्या घोषणा हा नेहमीप्रमाणे केलेला गोरे यांचा आणखी एक स्टंट असलेचा आरोप शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

आमदार जयकुमार गोरे यांनी उपभोगलेल्या अनेक सत्ता काळात तसेच आमदारकीच्या साडे बारा वर्षांच्या कार्यकालात ते जिहे कठापूर योजनेला पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. तसेच उत्तर माणच्या बिजवडी परिसर व कारखेलपर्यंतच्या या कायम वंचित व दुष्काळी एवढेच नव्हे तर कोणत्याच योजनेत नसलेल्या या भागाला पाणी वाटपात देखील साधे समाविष्ट करु शकले नाहीत ही शोकांतिका समजावीका? परंतु, कित्येक स्थानिक निवडणूकांमध्ये या भागांमधील गावां गावांत जाऊन अगणित आश्वासने देताना व आजदेखील तेच करताना भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार गोरे काडीचेही थकत नाहीत ही भोळ्याभाबड्या जनतेची क्रूर चेष्ठा केल्यासारखेच असलेचे मत उद्विग्नपणे भोसले यांनी मांडतानाच, जनतेने ज्यांना भरभरुन दिले आहे अशांनी “देर है परंतु दुरुस्त” या उक्तीप्रमाणे या जीवन मरणाच्या प्रश्नांचे भांडवल न करता जबाबदारीने काम करावे असा सरशेवटी सल्ला देखील भोसले यांनी दिला आहे.

Manganga
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!