घरात पोपट पाळण्याची हौस बऱ्याच जणांना असते. परंतु याच पाळीव पोपटामुळे एका व्यक्तीला जेलमध्ये जावे लागले आहे. इतकेच नाही तर पोपटाच्या मालकाला ७४ लाख रुपये दंडही भरावा लागला आहे. पोपटामुळे एक डॉक्टर घसरून पडले आणि त्यांची हाडे मोडली. कमरेच्या हाडाला दुखापत झाली. त्यामुळे वर्षभर डॉक्टरला बेडवरच पडून राहावे लागले. त्यामुळे या डॉक्टरने पोपटाच्या मालकाविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आणि कोर्टानेही या प्रकरणाचा निकाल सुनावला.

देशाच्या सेंट्रल न्यूज एजेन्सीनुसार, पाळीव पोपटाने एका डॉक्टरला जखमी केले. त्यामुळे पोपटाचा मालक हुआंगवर ९१ हजार ३५० डॉलर दंड ठोठावण्यात आला. त्याशिवाय त्याला २ महिने जेलची हवाही खावी लागणार आहे. पाळीव पोपटामुळे डॉक्टरच्या कमरेचं हाड मोडले. ही घटना डॉक्टर पार्कमध्ये जॉगिंगला गेले असताना घडली. अचानक एक पोपट आला आणि डॉक्टरच्या खांद्यावर बसून फडफडायला लागला. हे पाहून डॉक्टर घाबरले आणि जमिनीवर घसरले. यात ते जखमी झाले त्यानंतर उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला नेले.
या प्रकारानंतर डॉक्टर लिन यांनी पाळीव पोपटाचे मालक हुआंग यांच्यावर कोर्टात केस दाखल केली. कोर्टात लिन यांनी म्हटलं की, या घटनेनंतर वर्षभर मला बेडवर पडून राहावे लागले. त्यामुळे मला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्याचसोबत माझ्या उपचारासाठीही खूप पैसे खर्च झाले. नुकसानापोटी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. तर कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान ठेवतो. परंतु मी या निर्णयाविरोधात अपील करणार आहे. पोपट आक्रमक नव्हता आणि नुकसान भरपाईची रक्कम खूप अधिक आहे असा युक्तिवाद पाळीव पोपटाच्या मालकाने मांडला.