Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीमंताचे गाव कोणते गाजतेय; करोडपती शेतकरी नक्की काय पिकवतात?

0 378

 

भारतात अशी अनेक शहरे आहेत जी श्रीमंतांच्या यादीत गणली जातात. पण, भारतातील एक गाव श्रीमंत लोकांच्या यादीत झळकले आहे. खास गोष्ट अशी की, या गावातील सर्व लोक शेतकरी असून ते इतर काही जोडधंदा नाही तर केवळ शेतीच करतात.

 

Manganga

भारतातील या गावातील लोकांच्या उपजिवीकेचे साधन हे शेती आहे. या शेतीच्या जीवावर ते वर्षाला ८० लाखाचे उत्पन्न काढतात. तूम्हाला प्रश्न पडला असेल की ते शेतकरी असे काय पिकवतात की ज्याचे त्यांना एवढे पैसे मिळतात. हिमाचल प्रदेशातील चौपालचे जिल्ह्यात असलेले मडावग या गावाने हि किमया केली आहे. या गावातील लोक सफरचंदाची शेती करतात. त्यातूनच या गावकऱ्यांच्या बॅंक बॅलेन्समध्ये जास्त पैसे जमा झाले आहेत.

 

छैयान राम मेहता या शेतकऱ्याने १९५४ मध्ये पहिल्यांदा याची सुरुवात केली होती. परिसरातील लोक प्रामुख्याने बटाट्याची शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु पोलिस पाटील बुधी सिंग आणि काना सिंग डोग्रा यांनी स्थानिक लोकांना सफरचंद शेती करण्यास प्रोत्साहन दिले. २००० नंतर मडावग प्रदेश सफरचंद उत्पादनासाठी जगभर ओळखला जाऊ लागला. आता येथील बागायतदार सफरचंदाच्या एचडीपी या आधुनिक तंत्रज्ञानाकडे आकर्षित होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!