गुलमर्ग येथील अफ्रावत शिखरावर प्रचंड हिमस्खलन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही परदेशी स्कीअर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुलमर्ग स्कीइंग रिसॉर्टच्या वरच्या भागात हे हिमस्खलन झाल्याचे सांगितले जात आहे.
सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले, अशी माहिती बारामुल्ला पोलिसांनी दिली आहे. या घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून, दोन परेदेशी नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

बारामुल्ला पोलिसांनी सांगितले की, ‘गुलमर्गच्या प्रसिद्ध स्की रिसॉर्टच्या वरील भागात असणाऱ्या अफ्रावत शिखरावर हिमस्खलन झाले आहे. सध्या बारामुल्ला पोलिसांसह इतर यंत्रणांकडून बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच काही स्कीअर अडकल्याचे सांगितले जात आहे.