भारताचे नाव जगभऱ्यात उंचावणारी धाडसी महिला म्हणजे कल्पना चावला. आजचा दिवस भारताच्याच नव्हे तर जगाच्या पातळीवरदेखील मोठा होता. 1 फेब्रुवारी 2003 रोजी, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’चे स्पेस शटल पृथ्वीवर परतत असताना त्याचा अपघात झाला, ज्यामध्ये सात अंतराळवीर ठार झाले. या अपघातात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचाही समावेश होता.

आज 1 फेब्रुवारी, 20 वर्षांपूर्वी याच दिवशी एक अंतराळ दुर्घटना घडली होती, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर झाला. 1 फेब्रुवारी 2003 रोजी, अमेरिकन स्पेस एजन्सी ‘नासा’चे स्पेस शटल पृथ्वीवर परतत असताना त्याला अपघात झाला, ज्यामध्ये सात अंतराळवीर ठार झाले. या अपघातात भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांचाही समावेश होता.
कल्पना चावला भारतासह जगभरातील मुली आणि महिलांसाठी आयकॉन बनल्या. या दुर्घटनेने नासाला त्यांची कार्यपद्धती बदलण्यास भाग पाडले होते. भारतीय वंशाच्या कल्पना यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण टागोर बाल निकेतनमध्ये केले.
कोलंबिया उड्डाण ही कल्पना चावलांची पहिली अंतराळ यात्रा नव्हती. यापूर्वी 1997 मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या प्रवासादरम्यान 372 तास अंतराळात घालवले होते. 16 जानेवारी 2003 रोजी त्यांचा दुसरा अंतराळ प्रवास सुरू झाला होता. परंतु, 1 फेब्रुवारी 2003 रोजी हे अंतराळ यान पृथ्वीवर परत येत असताना अचानक खराब झाले. या अपघातात कल्पना चावलासह अन्य सहा अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
1986 मध्ये ‘चॅलेंजर’नंतर अमेरिकेचा हा दुसरा स्पेस शटल अपघात होता. यानंतर अमेरिकेतून अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे बंद करण्यात आले. दोन वर्षांहून अधिक काळ, कोलंबिया दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही अंतराळयान उड्डाण केले गेले नाही. अखेर, नासालाही आपल्या सुरक्षा नियमांत बरेच बदल करावे लागले होते.