केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सुरुवातीच्या भाषणातच त्यांनी शेतकरी आणि पिकांचा उल्लेख केला. बुधवारी त्यांनी देशात भरडधान्य उत्पादनासाठी श्रीअन्न योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी देशातील बाजरी म्हणजेच भरड धान्याचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांबद्दल सांगितले. यासाठी त्यांनी इंडियन मिल्ट्स इन्स्टिट्यूटच्या स्थापनेबद्दलही भाष्य केले.

ज्वारी, बाजरी, नाचणी, सावन, कांगणी, चेना, कोडो आणि कुट्टू या भरडधान्यांचा समावेश बाजरी पिकांच्या वर्गवारीत होतो. जीवनसत्त्वे, खनिजे, आहारातील फायबर किंवा इतर पोषक तत्वांच्या बाबतीत बाजरी फायदेशीर आहे. 2016-17 च्या आकडेवारीवरून असे म्हटले जाते की, वापरातील बदलांमुळे बाजरीच्या लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने घट झाली आहे.
राज्यातील विदर्भात मोठ्या प्रमाणात धान्य उत्पादक शेतकरी आहेत. आज सादर केलेल्या श्री अन्न योजनेचा फायदा धान्य उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. याचबरोबर सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात ज्वारी बाजरीचे उत्पादन घेतले जाते. याचा फायदा या शेतकऱ्यांनाही होणार आहे.