Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांना येणार ‘कॉर्पोरेट लुक’ आटपाडी शाखेचे नूतनीकरण : ‘शेतकरी भवन’ उभारणार : तानाजी पाटील

0 820

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील, आटपाडी मार्केट यार्ड शाखेचे नूतनीकरण झाले असून खरसुंडी, घरनिकी, दिघंची या शाखांचे नूतनीकरण होणार असल्याने आटपाडी तालुक्यातील जिल्हा बँकेच्या सर्व शाखांना ‘कॉर्पोरेट लुक’ येणार असून आता जिल्हा बँकेच्या शाखा सुद्धा बदलत आहेत. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोई साठी जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेच्या आवारामध्ये ‘शेतकरी भवन’ उभारणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी दिली. जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख साहेबराव पाटील, शेटफळेचे उपसरपंच विजय देवकर, उत्तम बालटे, मनोज नांगरे, नंदू कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बँकेचे अधिकारी हारून जमादार यांनी बँकेची प्रगतीचा आढावा घेत, माहिती दिली. यामध्ये तालुक्यात जिल्हा बँकेच्या एकूण १६ शाखा आहेत. तर ६५ कर्मचारी काम करत आहेत. एकूण ठेवी २९२ कोटी असून ४४१ कोटी कर्ज वाटप करण्यात आले असून तालुक्यात एकूण ७३३ कोटी व्यवसाय झाला असून ३१/०३/२०२२ अखेर १२ कोटी ८० लाख रुपयांचा नफा बँकेला झाला आहे.

Manganga

शेती कर्जा बरोबरच बँक शेती कर्ज पुरवठा करत असून घरबांधणीसाठी ९ टक्के, वाहन कर्ज ९ टक्के, व्यापारी उद्योग कॅश क्रेडीट ११ टक्के, लोक अगेस्ट प्रॉपर्टी ११ टक्के, पगारदर नोकरांना १० टक्के, तर सोने गहाण कॅश क्रेडीट महिलांना ८.५ तर पुरुषांना ९ टक्के दराने कर्ज पुरवठा करते.

बँकेचे ७४६ पगारदार नोकर सभासद असून बँकेने त्यांना ४० कोटी रुपये कर्ज वाटप केले आहे. तर शेती कर्जासाठी बँकेच्या अधिपत्याखाली ७० विकास संस्था आहेत. सन २०२१-22 अखेर शेती कर्जे वसुली ही सरासरी ८२ टक्के झाली आहे. तर थकीत वसुलीपोटी बँकेने १६०० १६०० जणावर १०१ ची कारवाई केली असून बँकेने वसुलीसाठी इतर बँकेना ॲटेचमेंट केली असल्याने त्यामुळे बँकेची वसुली मध्ये मोठा फरक पडत आहे. यावेळी बँकेचे अधिकारी हारुण तांबोळी, सुभाष पाटील, सोमनाथ गोडसे यांच्यासह कमर्चारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!