महामार्गावर भीषण अपघात होऊन पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
महामार्गावर भीषण अपघात पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पुणे: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्या जवळील चौफुला येथे पहाटे पाऊणे पाचच्या सुमारास बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला होता.
अपघातात पुणे व सोलापूर जिल्ह्यातील 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या अपघातात पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहर पोलिस दलातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मृत पोलीस कर्मचाऱ्यांपैकी नितीन शिंदे हे गुन्हे शाखामध्ये कार्यरत होते. अपघातग्रस्त लक्झरी बस सोलापूरकडून पुण्याच्या |दिशेला जात होती.

याच मार्गावर एका ट्रकचा टायर फुटल्यामुळे तो रस्त्यांच्या बाजूला उभा केला होता. बस चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि मागच्या बाजूने ही बस जाऊन धडकली हा अपघात एवढा भीषण होता की, यात बसचा चक्काचूर झाला.