आपण लहानपणी अनेक विनोदी पराक्रम केले असतील. अनेकवेळा शाळेत भांडणे केले किंवा अभ्यास नाही केला तर शिक्षक पालकांकडे तक्रार करायचे. तर परिक्षेत पास नाही झालो तर घरचे आपल्याला चांगलेच चोपून काढायचे. अशा कित्येक कारणावरून आईवडिलांचा आपण आयुष्यात एकदातरी मार खाल्लेला असतो. पण परिक्षा पास झाल्यावर आपल्याला आईवडिलांकडून चांगले बक्षीस मिळत असते. तर अनेकदा नापास झाल्यावर घरच्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. सध्या एका मुलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्याला वडिलांनी दिलेले गिफ्ट पाहून त्याला मोठा धक्का बसला आहे. तर अजूनही हा मुलगा धक्क्यातून बाहेर आलेला नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वडिलांनी आपल्या लाडक्या मुलाला रिक्षा गिफ्ट दिला आहे. त्यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपला मुलगा नापास झाला की त्याने आता शिक्षण न करता काहीतरी कामधंदा करावा या दृष्टीने पालकांकडून हा निर्णय घेण्यात येतो. तर या गिफ्टमुळे या मुलाला चांगलाच धक्का बसला असेल.