Latest Marathi News

BREAKING NEWS

नोकरी सोडून फुलविली स्ट्रॉबेरी शेती! दिवसाआड पाच-सहा हजारचा फायदा

0 164

 

सातारा: कास पठार परिसरातील चिकणवाडी, कुसुंबी येथील तुकाराम चिकणे यांनी खासगी पवन चक्की ऑपरेटर नोकरी सोडून सहा गुंठ्यात पाच हजार रोपांची स्ट्रॉबेरीची शेती फुलविली. नवनवीन यशस्वी प्रयोगातून स्ट्रॉबेरी फळाचे भरघोस उत्पादन प्राप्त होऊन परिसरातील बाजारपेठेसह पुणे, मुंबईत विक्री करत दिवसाआड पाच सहा हजार रुपयांचा फायदा होत आहे.

 

Manganga

नोकरी नको एखादा व्यवसाय बरा, नोकरी सोडून आपल्याला काहीतरी करायचे आहे. असे विचार अनेकांना भांबावून सोडतात. सगळे ठीक आहे अनेकजण असा विचार करतात. मात्र जेव्हा नोकरी सोडायचा विचार येतो त्यावेळी मात्र ते दोन पावलं मागे येतात. अनेकांना त्यांचा संसार असतो. अगदी याचप्रमाणे तुकाराम चिकणे या ध्येयवेड्या शेतकऱ्याने नोकरी नाकारून आपले नवे अस्तित्व निर्माण केले.

सहा गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली. डोंगरमाथ्यावरील वातावरणात लागवड करून यशस्वी उत्पादन घेत आहेत. शेतीची मशागत करून शेणखत, जीवांमृत वापरले. चार फुटांवर बेड तयार केले. कीटकनाशक, औषध फवारणी, ठिबक सिंचनाचा वापर केला. रोपांची लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी फुले येऊन ५५ दिवसात फळास सुरुवात झाली. दहाव्या दिवशी फळ परिपक्व होऊ लागले.

फळांचा रंग गडद लाल असून मोठ्या फळांचे वजन दीडशे ग्रॅम पर्यंत आहे. झाडाला पिकल्याने गोडवा जास्त असून शंभर रूपयांना एक बॉक्स प्रमाणे आसपासच्या जिल्ह्यात तसेच मुंबई, पुण्यात विक्री होत असल्याचे समाधान मिळत आहे. भिलार मधील नारायण ढेबे मित्राकडून मार्गदर्शन मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!