‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत राज्यगीत म्हणून घोषित झाले आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे.

शाहीर साबळे यांनी गायलेलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं गीतकार राजा बढे यांनी लिहिलं आहे. तर श्रीनिवास खळे हे या गाण्याचे संगीतकार आहेत. प्रेरणागीत, स्फूर्तीगीत म्हणून या गाण्याची ओळख असून मागील अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला या गाण्याने वेड लावले आहे.
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्याप नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा