Latest Marathi News

BREAKING NEWS

पाच वर्षांपासून रखडलेल्या TIT परीक्षांची घोषणा

0 220

 

गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक अभियोग्यता बुद्धीमत्ता चाचणीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. D.Ed B.Ed यांना आंणदी बातमी  २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीत या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. यासाठी ८ फेब्रुवारीपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी आजपासून ते ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ दरम्यान शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणीसाठी आवश्यक असणारी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

Manganga

गेल्या पाच वर्षांपासून लाखो डी.एड बी.एड उमेदवार आणि ५४ हजार पात्र शिक्षक या परिक्षेची वाट बघत होते. त्यानंतर आता या सर्वांची प्रतीक्षा संपली असून, येत्या २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान विविध सेंटर्सवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. २०१७ मध्ये पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. या पोर्टलच्या माध्यमातून विविध व्यावस्थापनाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जाते.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध शाळांमध्ये अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मात्र, आता TIT परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या शिक्षक पदांवर भरती केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!