Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सीएनजी’ वर लालपरी धावणार

0 262

 

आता लालपरीचा डिझेलवरचा ‘प्रवास’ संपणार असून लवकरच ती ‘सीएनजी’वर धावणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने डिझेलवर धावणाऱ्या एसटी बसेसचे रूपांतर सीएनजीवर धावणाऱ्या गाडीत केले आहे. हा बदल योग्य असून त्यात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याने ही एसटी प्रवासी सेवेत धावण्यासाठी योग्य असल्याची मंजुरी हरियाना येथील आयकॅट संस्थेने दिली. त्यामुळे लालपरी सीएनजीवर धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात लवकरच एक हजार एसटी बस ‘सीएनजी’वर धावताना दिसतील.

Manganga

राज्यात ‘सीएनजी’चा सर्वदूर पुरवठा नसल्याने राज्य परिवहन महामंडळाने ज्या ठिकाणी सीएनजी पुरवठा होईल, त्याच ठिकाणी ही सेवा देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात डिझेलवर धावणाऱ्या एक हजार एसटीचे रूपांतर ‘सीएनजी’मध्ये केले जाईल. केवळ शहरी भागापुरतीच ही सेवा असेल. या प्रक्रियेसाठी तसेच डेपोमध्ये ‘सीएनजी’ पुरवठा करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे.

आयकॅट ही हरियाना येथील मनेसारस्थित आंतरराष्ट्रीय स्तरांवरील वाहन क्षेत्राशी निगडित संस्था आहे. एसटी प्रशासनाने दापोडीच्या कार्यशाळेत एसटीतील डिझेलवरील इंजिनमध्ये बदल करून ती सीएनजीवर धावेल, अशी रचना केली. जानेवारी २३ मध्ये ही एसटी आयकॅटमध्ये परीक्षण व मंजुरीसाठी दाखल झाली. विविध प्रकारच्या चाचण्या घेऊन ही एसटी सीएनजीवर धावण्यास सक्षम असल्याचे प्रमाणपत्र परिवहन महामंडळाला देण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!