Latest Marathi News

BREAKING NEWS

एअर होस्टेसला मारहाण; ‘विस्तारा’त महिलेचा गोंधळ

0 244

 

मुंबई: काही दिवसांपूर्वी महिलासह प्रवाशावर लघुशंका केल्याचा प्रकार ताजा असतातानाच आता पुन्हा एक प्रकरण समोर आले आहे. एका ४५ वर्षीय महिलेने क्रू मेंबरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अबुधाबीहून मुंबईला येणाऱ्या विस्तारा एअरलाईन्सच्या विमानात घडली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एका इटालियन महिलेला अटक केली.

Manganga

पाओलाकडे इकॉनॉमी क्लासचे तिकीट होते. तरीही तिने बिझनेस क्लासमध्ये बसण्याचा आग्रह धरला. याला विरोध केल्यानंतर संबंधित महिलेने क्रू मेंबरच्या तोंडावर बुक्का मारला. एवढ्यावरच न थांबता या महिलेने हद्द पार करत अंगावारील काही कपडे काढले. संबंधित महिला हे कृत्य करत असताना दारूच्या नशेत होती असे सहार पोलिसांनी सांगितले. घटनेवेळी इतर उपस्थित क्रू मेंबर्सने संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. विमान मुंबई विमानतळावर लँड झाल्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पेरुसिओच्या वैद्यकीय तपासणीच्या प्राथमिक अहवालात ही महिला प्रवासादरम्यान दारूच्या नशेत होती असे दिसून आले आहे, या प्रकरणी संबंधित महिलेला न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावत जामीन मंजूर केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!