Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करुन खुनाचा प्रयत्न..

0 271

 

पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून तिला गंभीर जखमी केल्याबद्दल आनंद मसाजी याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला.

Manganga

करुणा आनंद वाघमारे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. नेकलेस दागिन्यासाठी ४ महिन्यापूर्वी २५ हजार रुपयांचे बुकींग केलेल्या पैशांबाबत विचारणा केली असता आनंद याने चिडून वाद घातला व हल्ला केला. वादानंतर करुणा त्यांच्या मुलासह त्यांचे वडील महादेव सुरवसे यांच्याकडे निघाल्या असताना आनंद याने चिडून शिवीगाळ केली.

उजवा हात पिरगाळून करंगळी शेजारील बोट दुमडले. करुणा यांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या हाताला चावा घेतला. आनंद याने बेडखालुन कोयता काढून “तुला आज संपवतोय, असे म्हणत करुणा यांच्या हडोक्यात, उजव्या भुवईच्या वर तसेच उजव्या कानाचे वर कोयत्याने सपासप वार केले. सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन निकम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!