पुणे : एमपीएसी परीक्षा पध्दतीत करण्यात आलेले बदल हे २०२५ पासून लागू करा यासाठी पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आज अराजकीय “साष्टांग दंडवत” आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अलका टॉकीज चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार हे देखील सहभागी झाले असून निर्णय होत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही असा इशार गोपीचंद पडळकरांनी सरकारला दिला आहे. राज्य सरकारमध्ये असून देखील तुम्ही आंदोलनात सहभागी होत आहात यामागचे कारण विचारले असता पडळकर म्हणाले की, जरी आम्ही सरकारमधले लोकप्रतिनीधी असालो तरी आम्ही लोकांमधील आहोत. आम्ही घरकोंबडे नाही. असा टोला गोपीचंद पडळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.
