Latest Marathi News

BREAKING NEWS

Asaram Bapu : स्वयंघोषित संत आसाराम बापू दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात दोषी : आज शिक्षेवर सुनावणी

0 616

गांधीनगर : गुजरातच्या गांधीनगर कोर्टाने सोमवारी (30 जानेवारी) दोन बहिणींवरील अत्याचार प्रकरणात स्वयंघोषित संत आसाराम बापू याला दोषी ठरवलं आहे. आज त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान, आसाराम बापूचा मुलगा नारायण साईही या प्रकरणात आरोपी होता. त्यालाही काही दिवसांपूर्वी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

आसारामची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा या चार महिला अनुयायांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आलं होतं. परंतु, या सर्वांची गांधीनगर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. त्याच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. 2013 मध्ये सुरतमधील दोन बहिणींनी नारायण साई आणि त्याचे वडील आसाराम बापू या दोघांविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. 2002 ते 2005 दरम्यान नारायण साईने वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याचं अल्पवयीनं मुलीनं तक्रारीत म्हटलं होतं.

Manganga

सुरतमधील आसारामच्या आश्रमात राहत असताना तिच्यावर बलात्कार झाला, असं लहान बहिणीनं सांगितलं होतं. दुसरीकडे, मोठ्या बहिणीनं तक्रारीत आसारामवर बलात्काराचा आरोप केला होता. अहमदाबाद येथील आश्रमात आसारामनं तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केल्याचं पीडितेनं सांगितलं. दोन्ही बहिणींनी पिता-पुत्राच्या विरोधात दोन स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!