रविकिरण जावीर, धोंडीराम करचे यांच्या निवडी
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी पंचायत समितीच्या सेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध रविकिरण जावीर यांची फेरनिवड तर व्हा.चेअरमनपदी धोंडीराम करचे यांच्याही बिनविरोध निवडी संपन्न झाल्या. तर संचालकपदी राजवल्ली मुलाणी, अमोल आरबळे, मल्हारी जाधव, रुक्मिणी खुटाण, रामचंद्र कोळी, अलका पवार, त्रिशला गायकवाड, गणेश देठे, संजय लोहार यांची संचालकपदी निवड झाली.
निवडीनंतर नुतन चेअरमन रविकिरण जावीर तर व्हा. चेअरमन धोंडीराम करचे तसेच नूतन संचालक मंडळ यांचा सत्कार श्री. कुलकर्णी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री सावता माळी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन नाना माळी, मैलमजुर पतसंस्था सांगली चेअरमन बापू फुले आदी मान्यवर उपस्थित होते.
