माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील वलवण येथे एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून आटपाडी पोलिसात गुन्हा नोंद झाली आहे.
यातील मयत संदीप तुकाराम जाधव (व.व.35) हे वलवण येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या राहत्या घरी कोणी नसताना त्यांनी अज्ञात कारणाने गळफास घेतला.
सदरची घटना ही दिनांक ३० रोजी घडली असून याबाबत पोलीस पाटील सुहास सुरेश शिंदे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास पोहेकॉ पाटील करीत आहेत.
