माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील बी.कॉम भाग तीन मधील व एन.सी.सी.च्या तृतीय वर्षाचा ‘सी’ सर्टिफिकेट (ए ग्रेड) उत्तीर्ण सिनिअर अंडर ऑफिसर संजय गजानन जगताप (गोमेवाडी ) याची कोल्हापूर एआरओ अंतर्गत झालेल्या इंडियन आर्मी भरतीमध्ये अग्नीवीर म्हणून भरती (निवड) झाली आहे. अत्यंत कष्टातून त्याने हे यश प्राप्त केले आहे.
१६ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. सांगलीचे कमांडिंग ऑफिसर एम. डी. नातू, ॲडम ऑफिसर कैलास चंद्र, सुभेदार मेजर हणमंत जाधव, लेफ्टनंट विठ्ठल गड, सुभेदार राजाराम पाटील, बटालियनचे सर्व हवालदार, पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय लोंढे, एन.सी.सी. ऑफिसर प्रा.विजय शिंदे यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन अमरसिंहबापू देशमुख, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कारंडे, सचिव हणमंत पवार, निरीक्षक अशोक चौगुले, आई व वडील सर्व नातेवाईक,तसेच महाविद्यालयातील एनसीसी समिती मधील प्रा.मोहन हजारे, प्रा. विष्णू जाधव प्रा.परमेश्वर झाकडे, प्रा.हणमंत माने यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयातील सर्व स्टाफ,सर्व कॅडेटस व विद्यार्थ्यांनी त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.